Thursday, May 14, 2009

वाट

खूप कविता आहेत
संध्याकाळी वाटे कडे तक लावून बसण्याबाबत
दिवस ढळल्यावर, तो कधी परत येईल या काळजीत.

भर दुपारी, टळटळीत उन्हात मी पहात आहे वाट.
माझं आसूसलेपण कळलंच नाही या लेखकांना.
पण तुलाही कळू नये?

संध्याकाळी तरी तू येशील या आशेने,
आता संध्याकाळीचीच वाट पहात बसले मी.
किमान हि वाट आहे सोबतीला.

- मी